( रत्नागिरी )
मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाटाच्या अवघड वळणावर सकाळपासून एक ट्रक बंद स्थितीत आहे. गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या या ट्रकवर क्रेनचे हेवी सामान दिसून येत आहे. अवघड वळणावरच हा ट्रक उभा करून ठेवण्यात आल्याने रत्नागिरीहुन संगमेश्वरच्या दिशेने जाणारी भरधाव वाहने आढळून मोठा अपघात होऊ शकतो.
गोव्याच्या दिशेला जाताना हा ट्रक पूर्णतः विरुद्ध दिशेला गेलेला दिसत आहे. ड्रायव्हरला जर तुम्ही हा चढाव चढवायचा होता तर त्याने लांबून टर्न बसवला असता. परंतु ट्रक चालकाने हा ट्रक विरुद्ध दिशेला जाऊन चढाव चढवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत आहे. छायाचित्रे पाहून आपल्यालाही हा प्रश्न पडेल.
🟧 अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी कोणतीही खूण दर्शवण्यात आलेली नाही. त्यामुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी महामार्ग पोलिसानी लक्ष घालून तो ट्रक बाजूला करावा, अन्यथा नाहीतर अपघात होईल हे सांगण्यासाठी कुठल्याही ज्योतिषाची गरज भासणार नाही.