(देवरूख / सुरेश सप्रे)
देवरुख शहराचे माजी नगराध्यक्ष कुणबी समाजाचे युवा नेते निलेश विठ्ठल भुरवणे यांची भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड करणेत आली आहे. देवरुख शहराचे माजी नगराध्यक्ष निलेश भुरवणे यांनी यापूर्वी भारतीय जनता पार्टी युवक जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सह देवरुख शहराचे नगरसेवक, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पडली आहे.
देवरुख नगरपंचायतीच्या मागील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला थेट नगराध्यक्ष पद व सत्ता मिळवून देण्यामध्ये निलेश भुरवणे यांचा सिंहाचा वाटा होता. रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी निलेश भुरवणे यांची जिल्हा भाजपा सरचिटणीस पदी निवड केल्याची घोषणा रत्नागिरी येथे भाजपा कार्यालय येथे केली.