(खेड / भरत निकम)
चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील तरुणी निलिमा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणी सखोल तपास करून तिच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी खेड राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने पोलिसांकडे निवेदनामार्फत करण्यात आल्याची माहिती अजिंक्य आंब्रे व ऍड. अश्विन भोसले यांनी दिली आहे.
दापोली येथील स्टेट बँकेत काम करणारी कु.निलीमा सुधाकर चव्हाण हि सायंकाळी आपल्या घरी जात असताना खेड एस.टी.स्टॅन्ड येथून दि. २९/०७/२०२३ रोजीपासुन बेपत्ता झालेली होती . त्यांचा संशयास्पद स्थितीतील मृतदेह दाभोळ येथे खाडीकिनारी आढळुन आलेला आहे. कै. निलीमा सुधाकर चव्हाण हीचा संशयास्पद मृत्यु झालेला असल्याने त्याचा सखोल तपास करून तिच्या मृत्युचे नेमके कारणाचा उलगडा व्हावा आणि तिचा घातपात झाला असल्याने आरोपीचा शोध घ्यावा आणि त्यांना कठोर अशी शिक्षा व्हावी. जेणेकरून कै. निलीमा सुधाकर चव्हाण हिच्या मृतात्म्यास शांती मिळेल आणि तिला व तिच्या कुटुंबियांस खरा न्याय मिळेल. तसेच समाजविरोधी घातक कृत्य करणाऱ्यांस आळा बसेल. आपण आपल्या स्तरावरून सखोल चौकशीचे आदेश दयावेत अशी विनंती निवेदनामार्फत करण्यात आली आहे.