(मुंबई)
विधिमंडळात लावण्यात येणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राची निमंत्रण पत्रिका छापण्यात आली असून २३ जानेवारी रोजी म्हणजेच बाळासाहेबांच्या जयंतीदिनी हा कार्यक्रम होत आहे. तत्पूर्वीच या तैलचित्रावर ठाकरेंच्या शिवसेना पक्षाने नाराजी व्यक्त केली.
तैलचित्र हे अपेक्षेनुसार नसल्याची भावना ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर, आता या तैलचित्र अनावरण सोहळ्याची कार्यक्रमपत्रिका छापण्यात आली आहे. मात्र, या कार्यक्रम पत्रिकेत ठाकरे कुटुंबातील एकाही सदस्याचे नाव नाही किंवा स्व. बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांचेही नाव नाही. त्यामुळे तैलचित्रावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.