(संगमेश्वर)
तालुक्यातील ओझरे जिल्हा परिषद गटातील निगुडवाडी गावातील ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यलय देवरुख कार्यक्रमात आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला.
आमदार शेखर निकम यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून विकास कामांबाबत चर्चा केली तसेच झालेली कामे व उर्वरीत असलेली कामे याचा मागोवा घेत ती टप्या टप्याने आपल्या भक्कम साथीने पाठपुरावा करुन पुर्ण करुन गावचा विकास करु असा शब्द दिला.
प्रवेशकर्त्यांमध्ये निगुडवाडीतील ग्रामस्थ प्रकाश गुरव, शांताराम गुरव, अमोल गुरव, किशोर गुरव, सुरेश गुरव, सुनील गुरव, रवींद्र गुरव शांताराम शंकर गुरव, विष्णू गुरव, पांडुरंग गुरव, चंद्रकांत गुरव, राजेंद्र गुरव, प्रमोद गुरव, नितेश गुरव, नथुराम गुरव, किरण बेटकर, राकेश गुरव, चंद्रकांत गुरव यांचा समावेश होता.
यावेळी बाळू ढवळे, हनिफ शेठ हरचिरकर, नितीन भोसले, मंगेश बांडागळे, हुसेन बोबडे, प्रफुल्ल भुवड, अनिकेत सुर्वे, पंकज पुसाळकर, रामू पंदेरे, प्रदीफ कांबळे, ओमकार गायकवाड, बाळू वनकर, दिनेश शिंदे, जयवंत पातेरे, जितेंद्र शेट्ये, सौ सोनाली नलावडे व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.