(मुंबई / प्रतिनिधी)
शिवसेनेचे ज्येष्ठ आणि वजनदार नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची माहिती माहिती मिळत आहे. काल रात्रीपासून एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये आहे. सूरतच्या ली मेरिडिअन हॉटेलात ते थांबले आहेत. पक्षावर नाराज असलेले एकनाथ शिंदे भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याचं बोललं जातं आहे. यातच आता नारायण राणेंनी सूचक ट्विट केले आहे. त्यामधे त्यांनी असं म्हटलेय , शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता. या ट्विट वरून आता पुन्हा नव्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अनेक आमदार सुरतला असल्याची माहिती समोर येत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर सोमवारी रात्री उशिरा ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी शिवसेना आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आमदार उपस्थित होते. मात्र एकनाथ शिंदे समर्थक आमदारांची अनुपस्थिती हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.