(संगलट-खेड / इक्बाल जमादार)
खेड तालुक्यातील व खेड ते दापोली मार्गावरील नारंगी नदीजवळ केबलच्या तारांच्या जाळ्यात अडकलेल्या मगरीला वनविभागाने जीवदान दिले आहे.
चिंचघर फाटा ते नारंगी नदी पात्रात केबलच्या तारांच्या जाळ्यात मगर अडकल्याची माहीती देण्यासाठी प्रसाद कदम यांनी वनविभागाला दूरध्वनीवरून संपर्क साधला. साधारण 4 वर्ष व 7 फुट लांबीची मगर केबलच्या तारेच्या जाळ्यात अडकल्याची माहीती वनविभागाच्या पथकाला मिळताच तात्काल वनविभागाने पथक घटनास्थळी दाखल होऊन पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मगरीला वाचविण्यासाठी रेस्क्यू करून तिला सुरक्षितरित्या वाचविण्यास सुरूवात केली. तारेच्या जाळ्यात अडकलेल्या मगरीला वाचविण्यासाठी कटरच्या मदतीने वाचविण्याचे काम केले.
या कामात सर्वेश पवार, श्र्वेत चौगुले, रोहन खेडेकर, सुमित म्हाप्रळकर यांच्या पथकाने जीवावर उदार होत मगरीला जीवदान देण्याची काम केले. याबाबत जनमानसातून वनविभागाच्या पथकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र मगरीला जीवदान देण्याची भुमिका वनविभाग बजावत असताना तेवढ्याच तत्परतेने बेकायदेशीर वृक्षतोड व जंगलतोडीकडे लक्ष देऊन वनाचे संवर्धन करावे, एवढीच माफक इच्छा पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त होत आहे.