(रत्नागिरी)
तालुक्यातील नाणीज आणि करबुडे येथे गावठी हातभट्टीची दारू बाळगल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन शांताराम भायजे (चोरवणे, ब्राह्मणवाडी, संगमेश्वर), संजय लक्ष्मण सोनवडकर (40, करबुडे, सोनवडकरवाडी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाणिज तळवाडी येथील जंगलमय भागात एका काजूच्या झाडाखाली सचिन भायजे हा गावठी दारू ताब्यात घेतलेल्या स्थितीत आढळून आला. त्याच्याकडे 500 रुपये किमतीची दारू आढळली. तर करबुडे येथे संजय सोनवडकर हा आपल्या ताब्यात गावठी हातभट्टीची दारू बाळगलेल्या स्थितीत आढळून आला. संशयित सचिन भायजे आणि संजय सोनवडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत.