( रत्नागिरी / प्रतिनिधी )
तालुक्यातील नाणीज येथील तरुण, सामाजिक कार्यकर्ते निलेश नारायण कांबळे यांची नुकतीच तक्षशिला सामाजिक संघटनेच्या रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल निलेश कांबळे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
दरम्यान ही निवड कोकण विभाग प्रभारी अध्यक्ष राजेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी देवानंद भू. कांबळे (सडोलीकर ) राष्ट्रीय महासचिव, दिगंबर य. बनसोडे -संस्थापक /राष्ट्रीय अध्यक्ष, सचिन ल. कदम – राष्ट्रीय उपाध्यक्ष, प्रमोद दि. बनसोडे -राष्ट्रीय युवा प्रमुख, लेखणी बुलंदचे संपादक मा. मुकेश ए. बनसोडे -राष्ट्रीय संघटक सचिव, मा. कामिनी दे. कांबळे -राष्ट्रीय महिला सचिव, शिल्पा चोपडे -राष्ट्रीय महिला अध्यक्ष, लुबिनी मु. बनसोडे -राष्ट्रीय उपाध्यक्ष, सना आ. कोठावळे -कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष, सुनिल निकाडे -विदर्भ विभाग उपाध्यक्ष, चंद्रकांत जाधव -महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, अजित कडलक -महाराष्ट्र प्रदेश प्रभारी अध्यक्ष, प्रकाश गायकवाड (शेठ )महाराष्ट्र प्रदेश महासचिव, अर्जुन कांबळे -कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष, विश्वास आ. जांभळे -पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, प्रा. डॉ. सचिन कांबळे -राष्ट्रीय सल्लागार आदी यावेळी उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुखपदी निवड झाल्यानंतर निलेश कांबळे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच सोशल मीडिया डिजिटल मीडियामध्ये त्यांच्या बातमीची वृत्त वाचून अनेकांनी शुभेच्छा दिल्या.