(जैतापूर / वार्ताहर)
राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प 2023-24 अन्वये राजाराम हायस्कूल भवानी मंडप कोल्हापूर येथे सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या पाच जिल्ह्यांच्या विभागस्तरीय भूमिका अभिनय स्पर्धा संपन्न झाल्या. सदर स्पर्धेत नाटे नगर विद्या मंदिर नाटे या प्रशालेने रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आणि सदर स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
प्रिया बसणकर, ग्रिश्मा दळवी, शिवानी चव्हाण, उमर सोलकर, फिदयान सोलकर या विद्यार्थ्यांनी या भूमिका अभिनय स्पर्धेत उत्कृष्ट अभिनय करून शाळेचे नाव विभागात उज्ज्वल केले. या भूमिका अभिनय स्पर्धेसाठी या प्रशालेचे माजी प्राध्यापक श्री.युवराज माळवी यांनी लेखन केले. या पूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्री. शरद चव्हाण यांनी प्रकारे केले व त्यांना जेष्ठ शिक्षिका सौ.सुमेधा संजय पावसकर तसेच सर्व सहकाऱ्यांनी सहकार्य केले. त्याबद्दल ग्रामपंचायत नाटे चे सरपंच तथा संस्था प्रमुख श्री.संदीप बांदकर, सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री.रविंद्र जाधव, ग्रामविकास अधिकारी श्री.राजेंद्रप्रसाद राऊत, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री.राजन लाड व सर्व सदस्य, ग्रामस्थ, सर्व पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.