(रत्नागिरी)
शहरानजीकच्या नाचणे येथे बेकायदेशीरपणे गावठी दारू विक्रीसाठी बाळगणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार १७ जून रोजी सायंकाळी ५.५० वा करण्यात आली. संदीप शंकर रणसे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
शनिवारी सायंकाळी शहर पोलिस शहरानजीकच्या नाचणे परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी आदिनाथ नगर सोसायटी समोरील झोपडपट्टी मागील जंगलमय भागात संशयित हा गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी आपल्याजवळ बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारू अधिनियम कायदा ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.