(मुंबई)
नागपूर ते मडगाव गोवा दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीला पर्यंत ०१ ऑक्टोबर २०२३ मुदतवाढ देण्यात आली आहे. विदर्भ, खान्देश ते कोकण मार्गावर ही गाडी चालवली जाणार आहे.
विदर्भ, खान्देशातुन थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी रेल्वेसेवा उपलब्ध नसल्याने अशा रेल्वेची राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनांकडून वारंवार मागणी केली जात होती. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ०११३९/०११४० नागपूर ते मडगाव गोवा आठवड्यातून दोनदा आता ०१ ऑक्टोबर २३ चालवली जाणार आहे
सुधारीत वेळापत्रकानुसार ही गाडी नागपूर ते मडगाव पर्यंत चालवली जाणार आहे. ही गाडी ०११३९ नागपूर येथून दर बुधवार, शनिवारी दु.०३.०५ वाजता सुटून गुरुवार,रविवारी मडगाव गोवा येथे सं.०५.४६ वा. पोहोचेल
मडगाव ते नागपूर जं दरम्यान धावताना ही गाडी ०११४० गुरुवार, रविवार मडगाव गोवा येथून सं.०८.०१ सुटुन दुसऱ्या दिवशी ०९.३० वा पोहोचेल.
नागपूर जं. ते मडगाव गोवा या प्रवासात ही रेल्वे गाडी वर्धा, पुलगांव, धामणगांव, बडनेरा जं,अकोला जं,शेगांव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, ईगतपुरी, कल्याण जं, पनवेल जं, रोहा, माणगांव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, थिवीम, करमाळी या स्थानकावर थांबणार आहे
नागपूर ते मडगाव प्रतिक्षा सुपरफास्ट एक्स्प्रेसचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष शेखर नागपाल, राष्ट्रीय रेल्वे समिती शेगांव सदस्य ॲड.पुरुषोत्तम डांगरा, संजय त्रिवेदी, राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष राजकुमार व्यास, राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना शेगांव राष्ट्रीय अध्यक्षा डाॅ.सौ.शबनम शेख, कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समिती मुंबई अध्यक्ष सुनिल उत्तेकर, पुणे कल्याण मार्गे सावंतवाडी रेल्वे प्रवासी समिती मुंबई अध्यक्ष यशवंत परब, राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव संघटनमंत्री ओमकार माळगांवकर, राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतूले, राष्ट्रीय संपर्क प्रमुख हर्षद भगत, ठाणे कुडाळ तालुकाध्यक्ष चैतन्य धुरी आदींनी केली आहे