(संगमेश्वर)
तालुक्यातील मौजे नांदळज गावात आमदार शेखर निकम यांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2022 -23 योजनेंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीतून बांधण्यात येणाऱ्या नांदळज ग्रामपंचायत इमारतीचा व अन्य विकासकामांचे भूमिपूजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले.
नांदळज गावासाठी एक सुसज्ज ग्रामपंचायत इमारत व गावातील विविध विकासकामांबाबत ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे मागणी केली होती. जिल्हा वार्षिक योजनेतून इमारत व विविध निधी फंडातून अन्य विकासकामांसाठी निधी दिला. यापुढेही नांदळज गावातील विकासासाठी प्रयत्नशील राहून अधिकाधिक विकासात्मक केम करण्यासाठीं आपण कटिबद्ध राहू असे आमदार निकम यांनी उपस्थितांना सांगितले.
या वेळी सरपंच पप्पू गोवळकर, उपसरपंच विनोद कांबळे, जयराम रहाटे, सुभाष गोवळकर, केशव डोंगरे, पोलिस पाटील संतोष घोटल, तालुका विस्तार अधिकारी घुले आदी उपस्थित होते.