(जाकादेवी/वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील जयगड प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचे सुपरवाईझर म्हणून अनेक वर्षे उत्तम कामगिरी बजावलेले आनंदा वसंत मुळ्ये हे आपल्या ३९ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाल्याने त्यांचा जयगड नळपाणी पुरवठा योजनेतर्फे कळझोंडी धरण येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी आनंदा मुळ्ये यांनी आपणाला आपल्यालाच गाव परिसरात नोकरी मिळाल्याची जाणीव ठेवून मी माझ्या कामामध्ये प्रामाणिक राहून नळ पाणी पुरवठा योजनेमध्ये या विभागात चांगल्या प्रकारे काम केल्याचा मला समाधान असल्याची उस्फुर्त प्रतिक्रिया आनंदा मुळ्ये यांनी सत्काराला उत्तर देताना दिली. यावेळी श्री. सौ मुळ्ये यांनी सत्काराबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली.
आनंद मुळ्ये यांच्या कामाचे कसब, कौशल्याबाबत अनेक मान्यवरांनी गौरवोद्गार काढले. यामध्ये प्रभारी सुपरवाईझर सुरेश पवार, सहदेव वीर, पत्रकार किशोर पवार, विनायक शितप, रविंद्र जाधव, सुनिल दर्गवळी, प्रकाश भागुराम पवार, श्री.गावणकर, केशव शितप इ सहकारी कर्मचारी व मान्यवरांचा सामावेश होता.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक- सूत्रसंचालन किशोर पवार यांनी केले. यावेळी आनंद मुळ्ये यांनी सेवानिवृत्त निमित्ताने सर्वांना स्नेहभोजन देऊन उपस्थितांना मनःपूर्वक धन्यवाद दिले.