(गुहागर/उदय दणदणे)
कोकणची बहुप्रिय लोककला “नमन” या लोककलेचं जतन संवर्धन आणि लोककलावंत यांच्या न्यायहक्कांसाठी नमन लोककला संस्था (भारत) ही संस्था कार्यरत असून संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
नमन लोककला संस्था संलग्न -शाखा राजापूरच्या वतीने मुबंईत नमन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचा प्रचार, प्रसार व सामाजिक प्रबोधन होण्याबरोबरच राजापूर शाखेच्या निधी संकलन उभारणी करीता दिनांक-१६ एप्रिल २०२२ शनिवार रोजी रात्रौ-०८-३० वा. दामोदर नाट्यगृह -परेल मुबंई येथे नमन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सदर आयोजित कार्यक्रमात राजापूर तालुक्यातील सुप्रसिद्ध असे दोन नमन मंडळ आपली कला सादरीकरण करणार आहेत. त्यात साई श्रद्धा प्रतिष्ठान नमन मंडळ – राजापूर यांचे पारंपरिक व समाज प्रबोधनपर नमन गण, गौळण सहित वगनाट्य-ओढ तुझ्या पंढरीची सादरीकरण होईल.
तर या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असणार आहे टिपरी खेळे सादरकर्ते बाईंगवाडी नमन नाट्य मंडळ – तेरवण ता.राजापूर यांचे. मुंबई रंगमंचावर गेली अनेक वर्षे गाजलेले नावाजलेलं राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध असं नमन मंडळ असून त्यांच्या खास शैलीत पारंपारीक वस्त्र परिधान करुन नटून थटून आपल्या समोर कला सादरीकरण करण्यात सज्ज असुन सदर नमन कार्यक्रमाच्या तिकीट बुकिंग करीता पिंकेश बापर्डेकर ८२९१५२७३४७, किरण बाईंग ७९७७३२०५७०, सुरेश मांडवकर ७३०४७७४९१४ या प्रतिनिधींकडे संपर्क साधावा असे नमन लोककला संस्था संलग्न -राजापूर शाखेच्या ग्रामीण / मुबंई वतीने आवाहन करण्यात आले आहे.
आपली लोककला आपली अस्मीता, आपली ओळख आहे, याची जान व मान ठेवून, मुंबईत सदर लोककलेच अस्तीत्व दाखवून देण्यासाठी व महाराष्ट्र शासनाकडून नमन लोककलेतील कलावंतांना न्याय देण्यासाठी संघटनात्मक चाललेल्या प्रयत्नांना आपण आपल्या सहभागाने सहकार्य करावे. सदर कार्यक्रमातून येणारा निधी हा नमन लोककलेच्या संघटना बांधणी व नमन लोककलेच्या उत्कर्षासाठी संकलीत करत आहोत .आपण सर्वांनी सदर कार्यक्रमाचे एक-एक टीकीट घेऊन आवश्य कार्यक्रम पहायला येऊन सहकार्य करावे. ही आम्ही नमन लोककलेतील समस्त कलावंत व रसिक प्रेक्षक यांना नम्र विनंती करीत आहोत असे आव्हान नमन लोककला संस्था अध्यक्ष श्री रवींद्र मटकर यांनी केले आहे.