(खेड/इक्बाल जमादार )
खेड येथील न्यायालयाच्या आवारात एका महिलेने औषधी गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना, गुरुवारी दुपारच्या सुमारास खेडमध्ये घडली. छाया सावंत (४५, बौद्धवाडी, वेरळ, ता. खेड) असे या महिलेचे नाव आहे. कोर्टातील कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी त्यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांनी हा प्रकार का केलाय याबाबतची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. घ
टनास्थळावरील प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार एक सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास खेड न्यायालयाच्या आवारातील मंदिराशेजारी छाया सावंत यांनी औषधी गोळ्या खाल्ल्यामुळे त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्या बेशुद्ध पडल्या. त्यांनी कसल्या गोळ्या खाल्ल्या, ते समजू शकलेले नाही. मात्र या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
न्यायालयातील कर्मचारी आणि न्यायालयीन कर्तव्यवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलवून त्या महिलेला कळंबणी उपजिजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. तेथे त्यांच्यावर लगेचच उपचार सुरू करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.