( रत्नागिरी )
रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे ग्रामपंचायत कार्यालयात तत्कालीन सरपंच, पोलीस पाटील व अन्य 4 जणांनी मिळून एकाची जमीन लाटल्याचा प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद नारायण साळुंके (83, रा. गणेशगुळे, नवेंद्रवाडी, ता. जि. रत्नागिरी) यांच्या मालकीची जमीन आहे. सर्व्हे नं. 36/अ/1/4 या जमिनीचे वाटप पत्र तयार करुन साळुंके उपस्थित नसतानाही 100 रुपयांच्या ब्रॉण्ड पेपरवर त्यांच्या नावाचा खोटा अंगठा उमटवून जमीन बळकावल्याचा प्रकार घडला आहे. आपली जमीन लाटल्याचे लक्षात आल्यानंतर साळुंखे यांनी पूर्णगड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
त्यानुसार पोलिसांनी गणेशगुळेचे तत्कालीन सरपंच (पोलिसांना नाव माहित नाही), गणेशगुळेचे पोलीस पाटील (नाव माहित नाही) तसेच यशवंत नारायण साळुंके, कृष्णा नारायण साळुुंके, प्रकाश विष्ण साळुुंके, अशोक विष्ण साळुंके अशा एकूण 6 जणांनी जमीन लाटल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी भादविकलम 420, 465, 467, 468, 471, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.