(मुंबई)
सुदीप्तो सेनचा ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट रिलिजपुर्वीच वादात अडकला होता. टिझर आणि ट्रेलरच्या वादात हा चित्रपट 5 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. मात्र रिलिजनंतर वादाच्या आणि पाठिंब्याच्या सत्रात द केरळ स्टोरीच्या बॉक्स ऑफिस कमाईने बाजी मारली. अवघ्या ४० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर २४२ कोटींची कमाई केली. त्यांनतर हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार होता. मात्र, ओटीटीवर खरेदीदार मिळत नसल्याचे सेन यांनी म्हटले आहे.
‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाला खरेदीदार मिळत नसल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी सांगितले आहे. बॉलीवूडने त्यांच्याविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोपही सेन यांनी केला आहे. या चित्रपटाला ओटीटीवर चांगली डील मिळत नसल्याबद्दल ते त्यांनी नाराजी व्यक्त करत ते म्हणाले की, चित्रपटसृष्टीत या चित्रपटाविरोधात एक टोळी तयार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. आतापर्यंत कोणताही चांगला प्रस्ताव आलेला नाही. आमच्याविरोधात षडयंत्र रचले जात आहे. त्यात प्रेक्षकांचा एक वर्गही या चित्रपटावर प्रचंड नाराज आहे. त्यामुळे ओटीटीवर चित्रपट रिलीज होणार नाही.
‘रेडिफ’शी या माध्यामाशी संवाद साधताना सुदीप्तो सेन म्हणाले की, ‘द केरळ स्टोरी’ ही चित्रपट सध्या कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार नाही आहे. समोर येत असलेल्या बातम्या खोट्या आहेत. आतापर्यंत कोणताही चांगला प्रस्ताव आलेला नाही. आम्हाला शिक्षा देण्यासाठी फिल्म इंडस्ट्री एकत्र आल्याचं दिसत आहे. आमच्या चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवरील यशाने चित्रपट उद्योगातील अनेक भाग अस्वस्थ केले आहेत.’
“द केरळ स्टोरी” (‘The Kerala Story’) हा चित्रपट केरळमधील काही महिलांची कथा सांगतो. ज्यांचा विश्वासघात करून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास आणि नंतर ISIS मध्ये सहभागी होण्यास भाग पाडले जाते. ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले असून निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली आहे. या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी आदी कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.