(मुंबई)
मुंबईत दोन खाजगी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. पार्कसमोर उभ्या असलेल्या एका बसला खाजगी वाहनाने धडक दिली असून त्यात मॉर्निंग वॉकला आलेल्या डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघाताच्या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. मुंबईतील कफ परेड येथील बुधवार पार्कजवळ हा अपघात आहे. या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कमल मिश्रा नावाच्या युजरने अपघाताचा व्हिडिओ ट्वीटवर शेयर केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास मुंबईतील कफ परेड येथील बुधवार पार्कजवळ एका बस उभी होती, त्यावेळी अचानक मागून आलेल्या एका भरधाव खाजगी बसने उभ्या असलेल्या बसला जोरदार धडक दिली. त्यात फुटपाथवरून मॉर्निक वॉक करत असलेल्या डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
A morning walker lost his life on Saturday morning after being hit by a BEST bus that collided with a stationary Chalo bus near Badhwar Park in Cuffe Parade after its driver lost control @myBESTBus @fpjindia pic.twitter.com/0MzwK2bDmk
— Kamal Mishra (@Yourskamalk) June 4, 2023
हा संपूर्ण थरारक अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृत्यूमुखी पडलेल्या डॉक्टरचा मृतदेह रुग्णालयात दाखल करण्यात आला. तसेच अपघातग्रस्त बसच्या चालकाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. हा अपघात नेमका कशामुळं झाला, याचं कारण समजू शकलेलं नाही. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनीही दुख: व्यक्त केलं आहे.