(मुंबई)
दिल्लीत आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि त्यावर सन्मानजनक तोडगा काढावा अशी विनंती मनसे अध्यध राज ठाकरे यांनी केली आहे. 28 मे रोजी कुस्तीपटूंची जी फरफट झाली ती पुन्हा होऊ नये यासाठी आपण स्वतः यामध्ये लक्ष घालावे असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
दिल्लीतील जंतरमंतरवर भारतीय कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष ब्रृजभूषण चरणसिंग यांच्यावर कारवाईची मागणी करत विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांच्यासह अनेक कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. महिला कुस्तीपटूंनी ब्रृजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत.
राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो, ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली असे कुस्तीपटू न्यायासाठी आक्रोश करत असताना 28 मे रोजी ज्या पद्धतीने त्यांची जशी फरफट झाली तशी फरफट पुन्हा होऊ नये. तसेच आपण स्वतः या विषयांत लक्ष घालून त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि सन्मानजनक तोडगा काढावा आणि भारतीय क्रीडाजगताला आश्वस्त करावे. सरकारकडून आंदोलन दडपण्यासाठी कुस्तीपटूंची धरपकड करण्यात आली. त्यानंतर विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी त्यांना ऑलिम्पिकमध्ये मिळालेली मेडल गंगेमध्ये विसर्जन करण्याचा इशारा दिला होता.
सन्मा. भारताचे पंतप्रधान @narendramodi जी, ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो, ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली असे कुस्तीपटू न्यायासाठी आक्रोश करत असताना २८ मे ला ज्या पद्धतीने त्यांची जशी फरफट झाली तशी फरफट पुन्हा होऊ नये.… pic.twitter.com/Qzjivo91xh
— Raj Thackeray (@RajThackeray) May 31, 2023
याप्रकरणी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. या प्रकरणी सन्मानजनक तोडगा काढा आणि भारतीय क्रीडा जगताला आश्वस्त करा, अशी मागणी राज ठाकरे यांनी या पत्रातून पंतप्रधानांकडे केली आहे.