(नवी दिल्ली)
‘एमजी’ मोटर कंपनीने नवीन छोटी ईलेक्ट्रिक कार बनवली आहे. ‘एमजी कॉमेट ईव्ही’ असे या कारचे नाव आहे. ही देशातील सर्वात लहान ईलेक्ट्रिक कार २६ एप्रिल रोजी भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. या गाडीची किंमती कंपनी मे महिन्यात घोषित केली जाणार आहे. कंपनीने या कारचे उत्पादन सुरू केले असून येत्या काही महिन्यात गाडीची डिलिव्हरीही सुरू होण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत कंपनीने याची रेंज, बॅटरी क्षमता इत्यादींचा खुलासा केलेला नाही. मात्र, या नव्या कारमध्ये १७.३ केडब्लूएच क्षमतेची बॅटरी असेल, जी ४२एचपी पॉवर आणि ११० न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. या कारला १०० टक्के चार्ज करण्यासाठी सात तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे एका चार्जवर २३० किमीचे अंतर पार करता येईल. शहरी ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन या कारची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच सुरक्षिततेसाठी या प्लॅटफॉर्मला एक मजबूत स्टील फ्रेम देण्यात आली आहे. ज्यामध्ये १७ हॉट स्टॅम्पिंग पॅनेल देखील उपलब्ध आहेत.