(रत्नागिरी)
भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास,कीर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व शिस्त विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त रस्ता सुरक्षा या विषयावरील पथनाट्य सादर करुन जनजागृती करण्यात आली. पथनाट्यामध्ये महाविद्यालयातील एकूण १७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
रत्नागिरी शहरातील रहाटघर बसस्थानक, मारुती मंदिर, रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे सादर करण्यात आले. पथनाट्याद्वारे स्वयंसेवकांनी रस्ता सुरक्षा संबंधी नियम व खबरदारी यांची माहिती दिली. पथनाट्याला प्रवासी, नागरिक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पथनाट्य सादरीकरणावेळी स्वयंसेवकांसोबत राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख सौ. ऋतुजा भोवड, शिस्त विभाग प्रमुख प्रा. सोनाली जोशी, प्रा. मिथिला वाडेकर व प्रयोगशाळा सहाय्यक गुरुप्रसाद कीर उपस्थित होते.