भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात इतिहास विभागातर्फे दि.१ ऑगस्ट २०२२ रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगिनी बापट हिने केले.
कार्यक्रमात वैष्णवी बाणे, श्रद्धा आंब्रे, चिन्मयी पालकर, कलावती पटेद, सुरेखा झोरे या विद्यार्थीनींनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच लोकमान्य टिळकांची माहिती सांगण्यात आली. या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ.मधुरा पाटील, उपप्राचार्या सौ.वसुंधरा जाधव,कला शाखा विभागप्रमुख सौ ऋतुजा भोवड, इतिहास विभाग प्रमुख सौ.रिया बंडबे उपस्थित होत्या. तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेजल मडके हिने केले. संस्कृती शेरबाळे हिने आभार मानले.