(रत्नागिरी)
चान्सलर ब्रिगेड राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण दहा दिवसीय आव्हान-२०२२ या शिबिराचे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे नुकतेच घेण्यात आले. या प्रशिक्षणासाठी देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या दर्शन विनायक शिंदे या विद्यार्थ्याची निवड करण्यात आली होती. त्याने हे चान्सेनर ब्रिगेड राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर यशस्वीरित्या पूर्ण केले, त्याबद्दल त्याला प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. महाविद्यालयाच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख सौ.ऋतुजा भोवड, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.