(रत्नागिरी)
भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर महाविद्यालयात जिल्हा निवडणूक विभाग, आयक्यूएसी विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महाविद्यालय निवडणूक साक्षरता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नवमतदार नोंदणी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक नायब तहसीलदार सौ.माधवी कांबळे यांनी विद्यार्थ्याना निवडणूक साक्षरता क्लबची माहिती दिली व मतदार नोंदणी करण्यासाठी कशा पद्धतीने अर्ज करावा, आवश्यक कागदपत्रे याबाबत माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांकडून मतदार नोंदणीचा अर्ज भरुन घेतला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ.मधुरा पाटील, उपप्राचार्या सौ. वसुंधरा जाधव , राष्ट्रीय सेवा योजना सहाय्यक प्रकल्पाधिकारी सौ.ऋतुजा भोवड ,निवडणूक साक्षरता मंडळ प्रमुख राखी साळगांवकर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुकुल प्रबंधक मनोज जाधव यांनी केले तर प्रा दीप्ती कदम यांनी आभार मानले.