(देवरूख / सुरेश सप्रे)
महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशनद्वारे घेण्यात आलेल्या 56व्या कॅरम स्पर्धेमध्ये पी.एस.बने इंटरनॅशनल स्कूलच्या कु. द्रोण हजारे व पाध्ये स्कूलची गुंजन खवळे यानी उत्तुंग यश प्राप्त केल्याने त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करणेत आली आहे.
राज्यात देवरूख हे कँरमपटूची पंढरी मानले जाते. या शहरातून अनेक कँरमपटूंची कारकीर्द घडली. तोच वसा पुढे नेत कु. द्रोण हजारे व कु.गुंजन खवळे यांनी शालेयस्तरावर ठसा उमटवत तालुकास्तरापासून ते आता राष्ट्रीयस्तरापर्यंत कॅरम स्पर्धेतील त्याची कामगिरी अतिशय उत्तम प्रकारे बहरत असून आता ते राष्ट्रीय कॅरमस्पर्धेत आपला ठसा उमटवून देवरूख ची परंपरा जोपासत आहेत, अशा विश्वास व्यक्त होत आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याचे निवड झाल्यामुळे सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गुंजन ही कॅरम व्यतिरिक्त गायन, वाचन, पेंटिंग अशा क्षेत्रात ती सदैव अग्रेसर असते. त्या दोन्ही युवा कँरमपटूचे माजी मंत्री रविंद्र माने, महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सचिव व माजी आम. सुभाष बने, रत्नागिरी जि. प. चे माजी अध्यक्ष रोहन बने, देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, तालुका कँरम असोसिएशनचे सुरेंद्र देसाई, दिलिप विंचू, दत्ता नार्वेकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.