(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने देवरुख येथील डी कॅड कॉलेजमध्ये १ ऑक्टोबर २०२३ रोजी मुले, मुली जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १२, १४, १८, २१ वयोगटात खेळविण्यात येणार आहे.
प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धकांच्या प्रवेशिका असणे आवश्यक आहे. इच्छुक सर्व स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका बुधवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत नोंदवावी, असे सांगण्यात आले आहे. ही नावे गुहागरसाठी प्रदीप परचुरे, रत्नागिरीसाठी विनायक जोशी, देवरुखसाठी मोहन हजारे, राहुल भस्मे, चिपळूणसाठी साईप्रकाश कानिटकर, दीपक वाटेकर, संगमेश्वरसाठी मनमोहन बेंडके, लांजासाठी विकास इंदुलकर, खेडसाठी योगेश आपटे, राजापूरसाठी मनोज सप्रे यांच्याकडे नोंदवावीत.
स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून कॅरम राष्ट्रीय पंच सचिन बंदरकर व राज्यस्तरीय पंच मंदार दळवी यांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेण्याचे आवाहन जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, सल्लागार सुचयअण्णा रेडीज, सचिव मिलिंद साप्ते, सदस्य मोहन हजारे यांनी केले आहे.