(देवरुख)
भाजपा संगमेश्वर तालुकाध्यक्ष व चिपळूण विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंपर्क अभियान सुरू आहे. याचाच एक भाग म्हणुन राजापूर येथे दि. २६ जून रोजी होणार्या महाजनसंपर्क अभियानांतर्गत भव्य जाहीर सभेच्या चिपळूण-संगमेश्वर विधानसभेच्या नियोजनाची बैठक संपन्न झाली. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तीन तत्त्वांवर आधारीत पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणार्या भारत सरकारने नुकतीच ९ वर्षे पूर्ण केली आहेत. याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरात मतदार बंधूभगिनींप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे.
कोकणातील भाजपा नेते, माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री ना. नारायणराव राणे जनतेचे आभार मानण्यासाठी राजापूर येथे येत आहेत. ‘मोदी@९’ महाजनसंपर्क अभियानांतर्गत भव्य जाहीर सभेस ते संबोधित करणार आहेत. याशिवाय विरोधी पक्षनेते श्री. प्रवीण दरेकर, मुंबई अध्यक्ष श्री. आशिष शेलार, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण, आमदार मा. श्री. नितेश राणे, माजी खासदार श्री. निलेश राणे सभेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला मोदी सरकारच्या रुपात देशाची सेवा करण्याची संधी मतदानाद्वारे उपलब्ध करून दिल्याबद्दल रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदार बंधू-भगिनींप्रति कृतज्ञता व्यक्त करणार आहेत.
सदर सभा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला जबाबदारी देणे, यादरम्यान येऊ शकणार्या अडचणींवर आगाऊ उत्तरे शोधून ठेवणे तसेच गाड्यांचे नियोजन करणे आदी विषयांवर या बैठकीत सांगोपांग चर्चा करण्यात आली.