वैभव पवार / गणपतीपुळे
छंद माणसाला जगण्यासाठी नवी ऊर्जा देतात. अशाच छंदातुन काही नवनवीन कल्पना सूचत असतात. त्याच कल्पनेतून राजेंद्र माने कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग & टेक्नोलॉजी, (आंबव देवरूख) मध्ये शिकणारे 3 विद्यार्थी अक्षय प्रभाकर शिखरे, सुरज दिनेश वेद्रे, सुशांत विजय शिंदे यांनी एक आगळीवेगळी कार बनवली आहे. ही नुसती कार नाही तर इलेक्ट्रिक आणि पेडल यांचा संगम आहे. या कारला त्यांनी बायो हाइब्रिड (Bio-Hybrid) असे नाव दिले आहे. नावाप्रमाणेच ही कार आहे.
सद्धयाची परिस्थिती पाहता इलेक्ट्रिक वाहन ही काळाची गरज बनत चालली आहे. याला कारणीभूत पेट्रोल अनं डिझेल च्या वाढत्या किमती. ही कार प्रदूषण रोखण्यासोबतच आरोग्याच्या दृष्टीने योग्य बनवली आहे. कारण या पेडलच्या वापरामुळे शारीरिक सुदृढ़ता वाढणार आहे. ही कार आकाराने इतर कार्स च्या तुलनेत खुप छोटी आहे. जेणेकरून तिने कमीत कमी जागा व्यापली पाहिजे. ३० ते ३५ km ची माइलेज देणारी ही कार २० kmph च्या वेगाने धावते. ही गाडी ३०० ते ३५० kg वजन घेऊन सहज धावु शकते. आणि ही कार अवघ्या 45000 रुपये मध्ये बनवण्यात आली आहे. ही कार मंगलमूर्ती ॲटो गॅरेज चे मालक दिनेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बनवण्यात आली.
जर लिथियम आयन बॅटरी आणि मोटर जास्त क्षमतेची वापरली तर ही गाड़ी माइलेज, वेग यामध्ये सहज वाढ देवू शकते अस त्यांचे म्हणणे आहे.भविष्यामध्ये सौरऊर्जा व डायनामो (Dynamo) लावून ऑटो चार्जिंग हा फिचर्स सुध्दा देऊ शकतो.