(देवरुख/सुरेश सप्रे)
गेले अनेक वर्षांची मागणी असलेल्या अग्निशमन यंत्रणेला अखेर मान्यता मिळाली आहे. देवरुखच्या नगराध्यक्ष सौ मृणाल शेट्ये यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. या यंत्रणेचा उपयोग फक्त देवरुखसाठीच नव्हे तर संगमेश्वर तालुक्याला होणार आहे. तालुक्यात वाढत्या आगीच्या घटना पाहता देवरुख नगरपंचायतीची अग्निशमन यंत्रणा असावी अशी मागणी गेले अनेक वर्षे होत होती. आज याची पुर्तता झाल्याने शहरवासियांनी सत्ताधाऱ्यांचे आभार मानले आहेत.
अग्नीशमन बंब आणि यंत्रणेची वैशिष्ट्ये :
९ टन चेसिस वर पाण्याच्या टाकीची क्षमता ४००० लिटर्स इतकी असेल. अत्याधुनिक हाय लो प्रेशर फायर पंप २००० LPM. फायर पंप गन मेटलचा असेल.
अत्याधुनिक हाय लो प्रेशर होस रील २०० फूट होस पाईप सहअत्याधुनिक फॉग जेट गन नग २
एल ई डी वॉटर टॅंक लेवल इंडिकेटर
फायमन केबिन. आपत्कालीन व आणीबाणी साठी लागणारे साहित्य
एल ई डी बार लाईट पी ए सिस्टिम व माईकसह
पाण्याची टाकी भरणेसाठी फायर पंपसाठी सक्शन करणेची सोय असेल जेणेकरून तुम्ही आपत्कालीन वेळेस त्या ठिकाणी पाण्याची विहीर किंवा हौद असेल तर त्यामधून पाणी सक्शन करून घेता येईल.
केमिकल व इलेक्ट्रिकल आग असेल तर फोम चा वापर करणेची सोय असेल.
पाण्याची टाकी भरणेसाठी हायड्रेन्ट हायड्रेन्ट सिस्टीम
नगरपंचायत कर्मचारी याना ट्रेनिंग दिले जाईल
अत्याधुनिक वॉटर मॉनिटर बसविला जाईल
Flat surface वर 200 फूट पर्यंत पाणी जाईल
वरील बाजूस 4 ते 5 माजली बिल्डिंग पर्यंत पाणी जाऊ शकेल
नगराध्यक्षा सौ मृणाल शेटये आणि सहकारी नगरसेवकांच्या गेल्या अनेक दिवसाच्या प्रयत्नांना यश मिळाले असून अग्निशमन बंब येत्या ४ ते ६ महिन्यात देवरुखवासियांच्या सेवेत दाखल होणार आहे.