(देवरुख /सुरेश सप्रे)
देवरुख शहर सुंदर व स्वच्छ ठेवणेसाठी शहरातील नागरीकांनी स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. आपलं देवरुख. सुंदर देवरुख या अभियानाला १ आठवडा झाला, हे नागरीक शहरात फिरुन जनजागृती करून व सकाळी ७ ते८ या वेळेत कचरा उचलतात. देवरूख शहरवासिय कचरा कुठेही टाकत आहेत. यापुढे कचरा टाकणेंवर सिसिटीव्हीने लक्ष ठेवले जात आहे, तसेच दंडात्मक कारवाईला सुरुवात झाली आहे. एकाच आठवड्यात सहा हजार रुपये दंडातून वसुल झाले आहेत.
सीसीटिव्ही लावण्यात आले आहेत. त्यावर स्वयंसेवक लक्ष ठेवुन आहेत.सकाळी, रात्री काही नागरीक कचरा बाहेर रस्त्यावर टाकताना आढळले आहेत. त्यांच्याकडून दंड वसुल करण्यात आला आहे. हे काम जागरुक नागरीक स्वयंस्फूर्तीने करत आहेत. नगरपंचायत या नागरीकांना सहकार्य करीत आहे. प्लास्टिक पिशवी वापर व बाहेर टाकणारा कचरा यावर हे नागरीक कडक लक्ष ठेवून आहेत.
देवरूख शहरात पहील्यांदा ही मोहीम १ वर्षापासून वाँर्ड न. ७ हायड्रो काँलनीतील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सुरू केली. त्यात दर रविवारी आपल्या परीसरातील कचरा उचलण्याचे काम केले जाते. तसेच झाडे लावली गेली आहेत. त्या झांडाना पाणीपुरवठाही केला जातो. तसेच त्या झांडाना कुंपण घालून खत घातले जाते. गेल्यावर्षी लागवड केलेली झाडे जागृतीने जोपासली जात आहेत. यावरूनच शहरातील जागरूक नागरीकांना एकत्र हे अभियान सुरू केले आहे.
स्वच्छ देवरूखसाठी सरकारी निधीवर जास्त भार पडू नये म्हणून कर्तव्य निधीही उभारला जात आहे. या निधीतून स्वच्छता मोहीमेला मदत केली जाणार आहे. या मोहीमेला प्रतिसाद मिळत असला तरीही काही नागरीक सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना दिसत असलेने या मोहीमेचे चळवळीत रुपांतर झाले असून जनजागृती वर भर दिला जात आहे. तसेच सर्व शासकीय कार्यालयातील स्वच्छतागृहांची पाहणी करून त्रूटींची योग्य ती दखल घेवून ती कायमची स्वच्छ राहीली पाहीजेत यावर भर दिला जात आहे.
बसस्थानकात प्रशासन व ठेकेदाराने दुर्लक्ष करून आवारात पडलेले भंगार व राडारोडा न उचल्याने आंदोलनाचे हत्यार जनतेने उपसलेवर त्वरीत प्रशासन जागे झाले व या समितीने तो सर्व कचरा, भंगार, माती आदी राडारोडा त्वरीत साफ करून जागा मोकळी केलेने बस स्थानकातील पार्किंगचा प्रश्न मार्गी लागणे मदत होणार आहे.
तरी नागरिकांनी जागृत राहून कसल्याही प्रकारचा कचरा सार्वजनिक ठिकाणी न टाकता न. प. च्या घंटा गाडीतच टाकावा. असे आवाहन करणेत येत आहे.