(संगमेश्वर / प्रतिनिधी)
देवरुखातील पर्शुरामवाडी येथे पऱ्या मध्ये बेकायदा गावठी हातभट्टीचे दारूचे साहित्य बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष सावजी पर्शराम (50, देवरूख, पर्शरामवाडी संगमेश्वर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रौढाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद महिला पोलिस कॉन्स्टेबल माया धोंडीराम गायकवाड यांनी देवरूख पोलिस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष पर्शराम हा बांबरचा पऱ्या येथे बिगर परवाना गुळ नवसागर मिश्रित कूजके रसायन वापरून गावठी दारू गाळण्याची भट्टी बांधून हातभट्टीची दारू गाळीत असताना आढळून आला. त्याच्याकडे 14 हजार 570 रुपये किमतीचे साहित्य आढळून आले. देवरुख पोलिस ठाण्यात त्याच्यावर महाराष्ट्र दारू अधिनियम कलम 65 ब, क, ड, फ, ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.