(देवरुख)
देवरुख येथे 30 वर्षीय महिला कृषी सहाय्यकाने आत्महत्या केल्याची घटना शनिवार 9 एप्रिल रोजी घडली होती. पूजा शिवकुमार राजपूत असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. राजपूत यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ही चिठ्ठी काल रविवारी पोलिसांना सापडली.
राजपूत या देवरुख तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी सहाय्यक या पदावर 4 वर्षे कार्यरत होत्या. तुरळ बिटची जबाबदारी त्या सांभाळत होत्या. नोकरी निमित्ताने त्या देवरूखातील एका बिल्डिंगमध्ये भाड्याने होत्या. बिल्डिंगच्या टेरेसवरील शौचालयामध्ये त्यांनी गळफास घेतला होता. आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसाना एका खोलीमध्ये सापडली. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘आपण स्व-इच्छेने आत्महत्या करत असून याप्रकरणी कोणालाही दोषी धरू नये. आत्महत्या करण्यासाठी माझ्यावर कोणीही जबरदस्ती केलेली नाही’ असे त्या चिठ्ठीमध्ये लिहिले होते, अशी माहिती देवरुख पोलिसांनी दिली आहे.