(लंडन)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनच्या ओव्हल मैदानावर डब्लूटीसीचा फायनल सामना खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या संघ पहिल्या डावात ४६९ धावा केल्या. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा संघ ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने पाच विकेट्सच्या मोबदल्यात १५१ केल्या आहेत. अजिक्य रहाणे (२९ धावा) आणि एस श्रीकांत पाच धावा करून नाबाद आहेत. भारत ३१८ धावांनी पिछाडीवर आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दुस-या दिवशी भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन केले. मात्र, दिवसाचा खेळ संपता संपता ऑस्ट्रेलियाने पुन्हा सामन्यावर आपली पकड निर्माण केली. भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४६९ धावांत संपवला. मात्र, भारताने आपल्या पहिल्या डावाची सुरुवात खराब केली. दिवसअखेर कांगारूंनी भारताची अवस्था ५ बाद १५१ धावा अशी केली. भारताकडून रविंद्र जडेजाने ४८ धावा करून झुंज देण्याचा प्रयत्न केला. जडेजाने आणि अजिंक्य रहाणेने पाचव्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी रचली. मात्र जडेजा दिवसाचा खेळ संपण्यासाठी काही षटके राहिली असतानाच बाद झाला. त्यामुळे टीम इंडियावर फॉलोऑनचे संकट घोंगावत आहे.
भारतीय गोलंदाजांनी दुस-या दिवशीच्या पहिल्या सत्रावर आपले वर्चस्व निर्माण केले. भारतीय गोलंदाजांनी या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या ४ विकेट्स घेतल्या तर कांगारूंना या सत्रात २४ षटकात फक्त ६५ धावा करता आल्या. लंचसाठी खेळ थांबला, त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या ७ बाद ४२२ धावा झाल्या होत्या.
दुस-या सत्रात भारताने ९५ धावात ४ विकेट्स घेतल्या होत्या. यानंतर दुस-या सत्रात भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव उरलेल्या तीन विकेट्स ४७ धावात घेत कांगारूंचा पहिला डाव ४६९ धावात संपुष्टात आणला. मोहम्मद सिराजने २८.३ षटकात १०८ धावा देत ४ विकेट्स घेतल्या.
भारताची अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जडेजा ही जोडी जमली असे वाटत होते. जडेजाही ४८ धावांपर्यंत पोहचला होता. भारत आजचा दिवस आरामात खेळून काढेल, असा अंदाज वर्तवला जात असतानाचा नॅथन लॉयनने त्याला बाद करत भारताला पाचवा धक्का दिला. अखेर दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ५ बाद १५१ धावा केल्या होत्या. अजिंक्य रहाणे २९ धावा करून तर केसी भरत ५ धावा करून नाबाद होता.