(गुहागर)
गुहागर तालुक्यातील पोसरे बुरटेवाडी येथे रविवारी (१२ मार्च) भव्य कुणबी भवनाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. या भवनाचे वंचित बहुजन आघाडीचे उत्तर जिल्हाध्यक्ष अण्णा (विकास) जाधव यांच्या शुभहस्ते रिबीन कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी नवतरुण मित्र मंडळ बुरटेवाडीच्या ग्रामस्थांकडून जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात अण्णा जाधव म्हणाले, ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या निवारण्याचे काम निवडून दिलेल्या प्रतिनिधींनीचे असते. मात्र जी कामे त्यांच्याकडुन करावयाचे आहेत ती कामे आम्ही निवडणुकीत पडलेल्या उमेदवारांना करावी लागत आहेत. याहून मोठं अपयश असू शकत नाही. ग्रामीण भागात असंख्ख प्रश्न किचपडत पडलेले पाहायला मिळतात. भुमीपुत्रींच्या नोकरांच्या, पायवाटा,रस्ते,कँमिकल कंपनीने घातलेला थैमान,कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो त्याचा साठा होण्याकरीता नियोजन नाही. ग्रामीण स्तरावर खुप सारे प्रश्न आहेत ते मांडुन पूर्ण होणार नाहीत तर प्रॅक्टिकली मैदानात उतरुन पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. आमदार भास्कर जाधव यांना सद्या स्वताच्या मतदार संघात लोकांच्या अडी-अडचणींना सामोरे जाण्यासाठी वेळ नाही मात्र दुसऱ्यांना पाडण्यात आणि खुन्नस काडण्यात वेळ आहे. अशी टिका देखील अण्णा जाधव यांनी आमदार भास्कर जाधवांवर केली.
या कार्यक्रमात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होत्या. आविनाश आदवडे, मंडळाचे अध्यक्ष संदिप उदेग, वाडीप्रमुख शिवराम बुरटे, नितेश खाडे, वनिता बुरटे, गुरुनाथ पाडेकर आदी उपस्थित होते.