मुंबई गोवा महामार्ग पाहणी दौर्यावर आलेले मनसे रस्ते आस्थापना विभागाचे कार्याध्यक्ष योगेश चिले व म.न.वि.से राज्य उपाध्यक्ष मनिष पाथरे आणि सहकारी यांची संगमेश्वर येथे सदिच्छा भेट घेऊन महामार्ग बाबत चर्चा केली.
यावेळी मनसे तालुकाध्यक्ष /नगरसेवक अनुराग कोचिरकर, रोजगार व स्वयंरोजगार सेलचे तालुका संघटक सनी प्रसादे, उपतालुकाध्यक्ष महेश गुरव, उपशहराध्यक्ष शेखर नलावडे, संगमेश्वर शहराध्यक्ष मनोज कोळी सरचिटणीस ओंकार लोध, शहर संघटक विशाल रापटे व महाराष्ट्र सैनिक आदी उपस्थित होते. यावेळी युवराज चिखले यांनी महामार्गाची आधिक माहिती दिली.