दिनांक २३ ऑक्टोबर २०२२ रोजी स्व. बाळासाहेब खेतले प्रतिष्ठान महाराष्ट्र आणि सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, (गुहागर विभाग) यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित दुर्गदर्शन व दुर्ग स्वच्छता मोहीम संपन्न झाली.
या मोहीमेत १. तनाळी फाटा, २. विराड वाडी फाटा, ३. साजेरी, ४. शीर फाटा या दिशादर्शक फलक बसविण्यात आले. तर किल्ल्याच्या आवारात इतिहास फलक लावण्यात आला
मोहीमेत विठ्ठल पाष्टे (गावकर ), पोलीस पाटील पाभरे अजित आग्रे, सामाजिक कार्यकर्ते अशोक बागकर, सुधाकर खेतले पोलीस पाटील कुटगीरी, दत्ताराम डिंगणकर, अर्जुन आग्रे, प्रदिप खेतले अध्यक्ष स्व. बाळासाहेब खेतले प्रतिष्ठान, कुटगीरी, हेमंत खेतले (माजी सैनिक), श्री. प्रकाश वीर(मार्गदर्शक), विठोबा खेतले, सुरज हुमणे, रोहीत सावंत, अंकित कदम, गणेश जाधव, ओम वीर, मंदार हुमणे व सदस्यांची उपस्थिती लाभली.
भविष्यात जास्तीत जास्त दुर्गसंवर्धन मोहीम कासारदुर्गवर घेण्यात येतील असे सह्याद्री प्रतिष्ठान कोकण संपर्क प्रमुख श्री. विनय काताळकर व सदस्य सौ. जोत्स्ना काताळकर यांनी सांगितले.