(दापोली)
तालुक्यामधील पंदेरी उटंबर येथील प्रदीप गायकवाड या ४३ वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
या अपघातासंदर्भात दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदीप गायकवाड हा ५ जुलै २०२३ रोजी दापोली येथून पंदेरीकडे जात असताना जलगाव ग्रामपंचायत येथे आले असता त्याचा गाडीवरील ताबा सुटला व मोटारसायकलवरून पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. गायकवाड याला तत्काळ उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे दाखल करण्यात आले. त्याच्यावर प्राथमिक उपचार झाल्यानंतर अधिक उपचाराकरिता एमजीएम हॉस्पिटल कामोठे नवी मुंबई येथे हलविण्यात आले. त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
या बाबात दापोली पोलीस ठाण्यात दि. ४ ऑगस्ट रोजी याची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद घेण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास दापोली पोलिसांकडून सुरू असल्याचे सांगण्यात आले.