(रत्नागिरी)
छत्रपती शिवाजी महाराज यांना रयतेचे राजे म्हणून संबोधले जाते महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून शिवाजी महारांजाचा आदर आहे. युगपुरुष म्हणूनही त्यांना ओळखले जाते. आपल्या सर्वांच्या मनात त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. परंतु शिवाजी महाराजांचा फोटो काही लोक दुचाकीच्या मागच्या नंबर प्लेटवर छापतात. यावर चिखल व अन्य घाण उडून महाराजांच्या किंवा अन्य महापुरुषांच्या प्रतिमेची अवहेलना होते. तरी नंबर प्लेटवर महापुरुषांच्या प्रतिमा छापू नयेत, अशी मागणी माजी सभापती व राष्ट्रवादीचे नेते शौकत मुकादम यांनी केली आहे.
सध्या सर्वत्र रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्ते खड्डेमय असल्याने रस्त्यांवरील साचलेला चिखल, धूळ व इतर कचरा नंबर प्लेटवर उडतो. त्याने नंबरप्लेट खराब होते. वेळीच ती स्वच्छही केली जात नसल्यामुळे शिवाजी महाराजांसह इतर महापुरुषांचे फोटो दुचाकीच्या मागच्या नंबर प्लेटर लावू नये दुचाकीच्या स्टेअरींग समोर ते लावले तर ठिक आहे. परंतु मागच्या बाजूस महापुरुषांचे फोटो लावणे योग्य वाटत नाही.तरी याबाबत सर्वांनीच खबरदारी घेऊन आपल्या महापुरुषांचा आदर होईल असे पाहावे, असे अवाहन माजी सभापती शौकत मुकादम यांनी केले आहे.
प्रादेशिक परिवहन खाते फॅन्सी नंबर प्लेटवर कारवाई करते तसे त्यांना अधिकार आहेत. परंतु त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नाही. तसे झाले तर हा प्रश्नच निकाली निघेल तसे प्रयत्न संबंधित अधिकाऱ्यांनी करावे, अशी मागणी श्री.मुकादम यांनी केली आहे.