(सैतवडे / वार्ताहर)
दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे ता. जि. रत्नागिरी येथे दि. २८ मार्च २०२३ रोजी मुस्लीम एज्युकेशन सोसायटी तर्फे मर्चंट नेव्ही करिअर गाइडन्स कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास मर्चंट नेव्ही मध्ये करिअर कसे करावे, याचे पूर्ण गाइडन्स देण्यात आले. यासाठी दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे १९७५ चे माजी विद्यार्थी आणि कॅप्टन प्रकाश जोग मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. कॅप्टन प्रकाश जोग हे आपल्या सत्कोंडी गावाचे रहिवासी असून त्याना २५ वर्षाचा सागरी अनुभव आहे.
कॅप्टन प्रकाश जोग यांनी मर्चंट नेव्ही इ १० वी आणि १२ वी नंतर कशी जॉंईन करावी याची पूर्ण माहिती विद्यार्थी आणि पालकांना दिली तसेच विद्यार्थी आणि पालकाच्या अनेक प्रश्नांचीही त्यांनी उत्तरे देवून त्यांच्या शंकाचे निरसन योग्यप्रकारे केले.
या कार्याक्रामचे सूत्रसंचालन दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेचे कला शिक्षक श्री पेढे यांनी केले. प्रास्ताविक शाळेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती देशमुख यांनी केले. तसेच मुख्य अतिथींचे स्वागत आणि सत्कार संस्थेचे अध्यक्ष श्री रहीम माद्रे यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्रीमती जाधव यांनी केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री रहीम हसन माद्रे, उपाध्यक्ष श्री शफी चिकटे, सचिव श्री रुमान पारेख, सदस्य श्री अकरम कापडे, न्यू इरा इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका कु. हिना खोत, कर्मचारी काजोळकर, दि मॉडेल स्कूल कर्मचारी वर्ग, विद्यार्थी वर्ग तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.