(रत्नागिरी)
इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी शनिवारी एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री रहिम माद्रे होते. तर कवीवर्य अरुण मोर्ये व श्री बद्रुद्दीन काझी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच संस्थेचे श्री चिकटे, सरपंच उषा सावंत, जनरल सेक्रेटरी रुमान पारेख, मुख्याध्यापक विलासराव कोळेकर आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
या शुभेच्छा समारंभाचे संपुर्ण संयोजन इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी केले.फलकलेखन, रांगोळी, कार्यक्रम पत्रिका, स्वागत, प्रास्ताविक, आभार सर्व नववीच्या विद्यार्थ्यांनी उतम त-हेने पार पाडले. यावेळी इयता १० वी च्या अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.मान्यवरांनी कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्याचे व तणावमुक्त परिक्षेला सामोरे जाण्याचे आवाहन केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी शाळा, संस्था व आपला नाव लौकिक करावा असे मार्गदर्शन केले. श्री अरुण मोर्ये यांनी एका बहारदार कवीतेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सर्व उपस्थित मान्यवर यांनीही खुप मौलिक मार्गदर्शन केले. त्यांच्याबरोबरच सौ.सुवर्णा देशमुख, सौ.ऋतुजा जाधव, श्री विनोद पेढे, श्री राजेश पोवार यांनी मनोगत व्यक्त केले.