(खेड)
दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी यांच्यावतीने रत्नागिरी जिल्ह्यातील अस्थिव्यंग दिव्यांग क्रिकेट खेळाडू यांच्यासाठी रविवार दिनांक २९ जानेवारी रोजी क्रीडा संकुल खेड येथील मैदान येथे एक दिवशीय लेदर बॉल क्रिकेट सराव शिबिर व क्रिकेट निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामधून दिव्यांग क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी या जिल्हा संघासाठी खेळाडू व संघ निवड करण्यात येणार आहे.
इच्छुक दिव्यांग क्रिकेट खेळाडूंनी अपंगत्वाचे ऑनलाइन प्रमाणपत्र, युनिक आयडी कार्ड, आधार कार्ड, लिव्हिंग सर्टिफिकेट, अथवा बोनफाईड प्रमाणपत्र यांची झेरॉक्स पासपोर्ट साईज दोन फोटो व खेळाच्या ड्रेस वर स्वतःच्या जबाबदारीने रविवार दि.२९/०१/२०२३ रोजी सकाळी ठीक ८ वाजता क्रीडा संकुल खेड येथील मैदानात उपस्थित राहावे. या संदर्भात अधिक माहिती करीता आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक प्रशांत सावंत ८३८०८३७५०० या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.