(रत्नागिरी)
दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक या संस्थेचे मार्गदर्शक सल्लागार श्री.कौस्तुभ बुटाला यांच्या सहकार्याने दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी यांचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री.प्रशांत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिह्यातील संगमेश्वर, दापोली, खेड येथील नोंदणी केलेल्या वीस गरजू दिव्यांग व्यक्तींना या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर श्री.संकेत बुटाला यांच्या हस्ते विविध दिव्यांग साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी प्रशांत सावंत, सागर आईनकर, रेणुका गोरीवले, पांडुरंग नाचरे, मंगेश चांदणे, ओम शिंदे,राज सावंत यांनी विशेष प्रयत्न केले.येत्या काही दिवसांत पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मोफत दिव्यांग साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.गरजू दिव्यांग व्यक्तींनी या संदर्भात अधिक माहिती करीता प्रशांत सावंत संपर्क क्रमांक ८३८०८३७५०० या क्रमांकावर संपर्क करावा असे आव्हाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.