(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील टेभ्ये येथे दारूच्या नशेत गुरख्याने घराची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. करण गोरख (रा. मुळ नेपाळ) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अभिनय रविंद्र साळवी (४६, रा टेंभ्ये ) यानी तक्रार दाखल केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनाक २८ मार्च २०२२ रोजी करण गोरख याने दारूच्या नशेत तक्रारदार यांच्या बंद घरामध्ये जबरदस्तीने प्रवेश केला. तसेच मुख्य दरवाजाचे गोल वाकवून मुख्य दरवाजा व बेडरूमचा दरवाजा तोडून नुकसान केले. अशी तक्रार अभिनय साळवी यांनी दाखल केली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार सावंत करत आहेत.