(संगमेश्वर)
तालुक्यातील दाभोळे येथील निनावी देवी मंदिरातील घंटा चोरीला गेल्याची घटना गुरुवारी (२७ जुलै) उघडकीस आली आहे. याप्रकरणी चोरट्यावर देवरूख पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरीची फिर्याद मंदिराचे पुजारी शांताराम बेलकर यांनी दिली आहे. पुजारी नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी देवतांची पूजाअर्चा करून आले. सायंकाळी पुन्हा दिवा लावण्यासाठी गेले असता, मंदिरातील घंटा चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ही बाब ग्रामस्थांच्या कानी घातली. अज्ञात चोरट्यावर देवरूख पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेडकॉन्स्टेबल विशाखा कदम याबाबत अधिक तपास करीत आहेत.