(दापोली)
गावठी हातभट्टीची दारु बाळगल्याप्रकरणी दापोलीतील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई ८ मार्च रोजी सायंकाळी ५:४५ वाजता हवेली पांगरी गुरववाडी ( ता. दापोली ) येथे करण्यात आली आहे. या कारवाईत ७७० रुपयांची १५ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे.
सहायक पोलिस फौजदार मंदार हळदे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुभाष गणू सकपाळ ( ५३ , रा . हवेली पांगारी बौद्धवाडी, ता. दापोली ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवेली पांगरी गुरववाडी येथील झाडाच्या झुडपाच्या आडोशाला सुभाष सकपाळ गावठी हातभट्टीची दारू घेऊन असताना ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास दापोली पोलिस करत आहेत.