(दापोली)
तालुक्यातील साखळोली येथे सामायिक जागेतील झाडे तोडू नको असे सांगितल्याने राग आल्याने सख्या भावाने गंभीर दुखापत केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी साखळोली येथे विजय देवजी शिंदे यांनी त्यांचे भाऊ प्रदीप शिंदे यांना सामायिक जागेतील झाडे तोडू नकोस असे सांगितले. त्याचा राग मनात धरून प्रदीप याने हातातील कोयती विजय यांना मारण्यासाठी उगारली असता विजय यांनी कोयतीची धारेची बाजू धरली. तेव्हा त्यांच्या उजव्या हाताच्या पंज्याला दुखापत झाली. प्रदीप शिंदे यांनी तेथेच पडलेली काठी घेऊन ती विजय यांच्या डोक्यात मारली. यात विजय यांना गंभीर दुखापत झाली असल्याची तक्रार त्यांनी दापोली पोलिस ठाण्यात दिली. या तक्रारीनुसार प्रदीप शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे