(दापोली)
ब्रिलीयंट करिअर अकॅडमी दापोली व रामराजे इंटरनॅशनल स्कुल दापोली आयोजित ऊर्जा २०२३/२४ या शालेय क्रीडा स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू प्रशांत सावंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्रशांत सावंत यांनी या स्पर्धेच्या युगात अभ्यासाबरोबर खेळालाही प्राधान्य दिलं पाहिजे, खेळात एकाच प्रयत्नात कोणीही यशस्वी होत नाही. यश मिळविण्यासाठी सातत्याने खेळाचा सराव व व्यायाम करणे गरजेचे आहे आजच्या तरुण पिढीने देखील मोबाईलवरील ऑनलाईन गेमच्या विळख्यात न अडकता नियमित खेळाच्या ग्राऊंडवर उपस्थित राहवून आपल्याला आवडत्या खेळाचा सराव करून विविध क्रीडा स्पर्धामधून सहभाग घेणे गरजेचे आहे, तरच अधिक चांगले खेळाडू घडतील असे मत व्यक्त केले.
स्पर्धा उद्घाटनप्रसंगी प्रशांत सावंत, शाळेचे संचालक महेश कदम, अध्यक्ष सुनिल दळवी, प्राध्यापक कुणाल मंडलिक, मुख्याध्यापक शेखर पाटील, दिपक पवार, पालक प्रतिनिधी, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.