(दापोली)
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरातील असूद जोशी आळी या ठिकाणी ट्रक आणि मँक्झिमो यांची समोरासमोर टक्कर झाली या भीषण अपघातात आठ जण मृत्युमुखी पडले असून त्यामध्ये दोन मुलींचा समावेश आहे. हा अपघात रविवारी दुपारी साडेतीन वाजता झाला. या अपघातात अन्य व्यक्ती जखमी झाल्या असून त्याला दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यातील गंभीर जखमींना मुंबई येथे हलवण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी 2 वाजण्याचे सुमारास अनिल (बॉबी) हे त्यांची वडाप मँक्झिमो क्रमांक एम. एच.08.5208 हे दापोलीतून आंजर्लेकडे 14 प्रवासी घेऊन जात असताना त्यांची गाडी आसूद जोशी आळी नजीक असलेल्या वळणावर आली असता समोरून येणाऱ्या ट्रक चालकाने बाहेरून टर्न मारल्याने मँक्झिमो ट्रकवर आदळली, ट्रॅकने डमडमला रस्त्याच्या डाव्या बाजूला घासत नेले, हा अपघात एवढा भयानक होता की मँक्झिमो मधील काहींचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात अनिल सारंग चालक (वय 45 रा. हर्णे), संदेश कदम (55), स्वरा संदेश कदम (8), मारियम काझी (6), फराह काझी (27), शारय्या शिरगांवकर सर्व (35 रा. अडखळ) तर मीरा महेश बोरकर (22, रा. पाडले), वंदना चोगले (वय 34 रा. पाजपंढरी) यांचा मृत्यू झाला आहे. तर सपना संदेश कदम (वय 34, रा. अडखळ), श्रद्धा संदेश कदम (वय 14, रा. अडखळ), विनायक आशा चोगले (रा. पाजपंढरी), भूमी सावंत (वय 17), मुग्धा सावंत (वय 14), ज्योती चोगले (वय 9 रा. पाजपंढरी) यांच्यावर उपजिल्हा व तर काही जखमींना मुंबई येथे हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच दापोलीचे पोलिस निरीक्षक विवेक आहिरे यांनी पोलीस कर्मचारी व रुग्णवाहीका घेऊन अपघातस्थळी धाव घेतली. प्रथमदर्शनी या अपघाताबाबत ट्रक चालकाच्या चुकीमुळे चार जणांना जीव गमवावा लागल्याचा अंदाज आहे. अपघातानंतर ट्रकचालकाने पलायन केले आहे.