दापोली : दापोली तालुक्यातील भुवडवाडी येथे शुल्लक कारणावरुन भावांमध्ये मारहाण झाली. यामध्ये पती-पत्नी जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन गणपत पवार (68, भुवडवाडी, दापोली) हे जुन्या घराजवळ चिरे टाकत असताना त्यांचे भाऊ यशवंत पवार, जयवंत पवार यांनी तू येथे चिरे टाकायचे नाही असे सांगून शिवीगाळ करु लागले. यावेळी मोहन यांनी सांगितले की ही जागा आपल्या सर्वांची आहे. हे सांगताच राग आल्याने यातील एक यशवंत याने रॉकेलचा कॅन हातात घेवून तुला व मला जाळून घेतो अशी धमकी दिली. तर जयवंत पवार याने हातात काठी घेवून भावजय अंजली पवार यांना काठीने मारहाण केली. यावेळी मोहन यांनी काठी टाकून देत दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला. तरीही दोघांना हाता-पायावर काठीने मारहाण केली. यात पती-पत्नी दोघेही जखमी झाले आहेत.
याबाबतची फिर्याद मोहन पवार यांनी दापोली पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार मारहाण करणार्या यशवंत पवार, जयवंत पवार यांच्यावर भादविकलम 324, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.